विद्यापीठाची परीक्षा ऑफलाइन देता येणार नाहीच ! विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी 

Online_exam
Online_exam
Updated on: 

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांतील द्वितीय व अंतिम वर्षातील सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांची साधारणपणे 13 जानेवारीपासून प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. आता कोणत्याही विद्यार्थ्यास ऑफलाइन परीक्षा देता येणार नाही, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना फोटोकॉपी देण्याचेही नियोजन विद्यापीठाने सुरू केले आहे. 

अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रथम वर्षाचे प्रवेश अजूनही सुरूच आहेत; तर दहावी-बारावीवरून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्यांची आता परीक्षा होणार नाही. जानेवारीत होणारी परीक्षा पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची होणार आहे. मागील परीक्षा कोरोनामुळे ऑनलाइन व ऑफलाइन घेण्यात आली. त्यात जवळपास 98 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. हा अनुभव पाहता, विद्यापीठाने आता ऑफलाइन परीक्षेचा पर्यायच ठेवलेला नाही. सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार असून, 31 जानेवारीपर्यंत ही परीक्षा संपविण्याचेही नियोजन आहे. ऑनलाइन परीक्षा असल्याने दोन सत्रात (सकाळ - दुपार) परीक्षा घेऊन काही दिवसांत निकाल जाहीर करण्याचेही नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन केल्याचे परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा यांनी सांगितले. 

विलंब शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार 
विद्यापीठ प्रशासनाने नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार असल्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार मुदतीत परीक्षा अर्ज भरण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना केल्या. काही विद्यार्थ्यांकडून विलंब व अतिविलंब शुल्कही घेतले. मात्र, परीक्षा नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत झाल्याच नाहीत. आता परीक्षा जानेवारीत घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटात विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाने घेतलेले विलंब शुल्क परत करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, युवा सेनेतर्फे करण्यात आली. कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थी हित पाहून विद्यार्थ्यांना विलंब शुल्काची रक्‍कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही रक्‍कम पुढील परीक्षा शुल्कात वर्ग करायची की विद्यार्थ्यांना ती रक्‍कम द्यायची, याचे नियोजन सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com