Solapur News : पाण्याच्या हौदात अज्ञात इसमाने विषारी औषध टाकले; ७ जणांची प्रकृती गंभीर

पाणी पिलेले सात जण आरोग्य खात्याच्या निगराणीखाली
unknown poured poison in water 7 people health in critical condition crime solapur
unknown poured poison in water 7 people health in critical condition crime solapurSakal

मंगळवेढा : तालुक्यातील डिकसळ येथील जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदामध्ये अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान पाणी पिलेले सात जण आरोग्य खात्याच्या निगराणीखाली आहेत.

unknown poured poison in water 7 people health in critical condition crime solapur
Solapur : लग्नात जेवण करताना राडा; दगडफेकीत चौघे जखमी; १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

डिकसळ ता.मंगळवेढा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाचे पाणी शाळेचे विद्यार्थी व लगतचे ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असून काल रात्री अज्ञात इसमाने विषारी औषध त्या हौदात टाकले ,

आज सकाळी नेहमीप्रमाणे या भागातील नागरिकांनी घरात ते पाणी नेले दरम्यान या पाण्याला कसला तरी वास येत असल्याचा संशय नागरिकाला आल्यानंतर याची चर्चा गावात वाऱ्यासारखे पसरली यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शाळेच्या परिसराचा शोध घेतला असता त्या विषारी औषधाची बाटली सापडली असून सदरचे औषध मरवडे येथील दुकानातून घेतले आहे का ?

unknown poured poison in water 7 people health in critical condition crime solapur
Solapur Train Accident : सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या Kk एक्स्प्रेसच्या इंजिनाला आग; 2 तासानंतर आग...

याचा तपास ग्रामस्थ करीत असून दरम्यान घटनास्थळी तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, गट प्रभारी गट शिक्षणाधिकारी पोपट लवटे यांच्या सह ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली असून सदर पाणी कोणीही पिऊ नये असे आवाहन करण्यात आले,

असून ज्यांनी पाणी पिलेले आहेत असे 3 बालके व 4 पुरुष सध्या आरोग्य खात्याच्या निगराणी खाली जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत सुदैवाने नागरिकाच्या जागरूकतेमुळे हा प्रकार लक्षात आला अन्यथा जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com