शेतातील घरात खताचा विनापरवाना साठा! खत विक्रेत्याविरुद्ध गुन्ह दाखल; सोलापूरच्या भरारी पथकाची दोन दिवसांतील सलग दुसरी कारवाई

जिल्हास्तरीय भरारी पथकाने जांभूड येथील नामदेव पाटील याच्या शेतातील घरावर छापा टाकला. तेथे कोंढवा (पुणे) येथील ए. जी. हायफा ॲग्रो व भूमिवेदा मार्केटिंग एलएलपी या नावासह पत्ता असलेल्या जैविक व रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा साठा आढळला. या खतांच्या उत्पादन व विक्रीचा परवाना नसल्याचे तपासणीत दिसून आले.
Nanded News
Nanded Newssakal
Updated on

सोलापूर : कृषी खात्याच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गुरुवारी (ता. ५) जांभूड (ता. माळशिरस) येथील एका शेतातील घरावर छापा टाकून विनापरवाना जैविक व रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्याचा साठा उघडकीस आणला. या प्रकरणी नामदेव अप्पासाहेब पाटील (रा. जांभूड, ता. माळशिरस) याच्याविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाने विनापरवाना खतसाठा केल्या प्रकरणी सलग ही दुसरी कारवाई केली आहे.

जिल्हास्तरीय भरारी पथकाने जांभूड येथील नामदेव पाटील याच्या शेतातील घरावर छापा टाकला. तेथे कोंढवा (पुणे) येथील ए. जी. हायफा ॲग्रो व भूमिवेदा मार्केटिंग एलएलपी या नावासह पत्ता असलेल्या जैविक व रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा साठा आढळला. या खतांच्या उत्पादन व विक्रीचा परवाना नसल्याचे तपासणीत दिसून आले. त्यामुळे संबंधित कंपनीने खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी माळशिरस पंचायत समितीचे कृषी अधिकारी नितीन चव्हाण यांनी फिर्याद दिली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, अजय वगरे, जिल्हा कृषी अधिकारी सागर बारवकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बाळू बागल, कृषी अधिकारी भरत कोळेकर यांनी ही कारवाई केली.

कारवाईवेळी आढळलेला साठा

हायफा कंपनीचे प्रतिपाकीट ८६६ रुपये किमतीचे तीन लाख ४६ हजार ४०० रुपयांची ४०० पाकिटे कीटक नियंत्रक, प्रतिपाकीट ८८९ रुपयांची तीन लाख ५५ हजार ६०० रुपयांची ४०० पाकिटे सल्फग्रो सल्फर व मोबिलायझर, प्रतिपाकीट ८६६ रुपयांची ३४ हजार ६४० रुपयांची ४० पाकिटे ॲक्टिव्हेटर, प्रतिपाकीट ७९९ रुपयांचे एक लाख ५९ हजार ८०० रुपयांचे ॲक्टिव्हेटर, प्रतिपाकीट एक हजार १७० रुपयांची दोन लाख ३४ हजार रुपयांची भूमिवेदा कंपनीची २०० पाकिटे, १० पाकिटे सल्फर व ॲझोबॅक्टरचे डेमो बॉक्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com