Solapur Nari Shakti Esakal
सोलापूर
Solapur : ‘जब तक तोडेंगे नहीं, तब तक छोड़ेंगे नहीं’; सिद्धरामेश्वर मंदिरालगतचे शौचालय हटविण्यासाठी सोलापूरच्या नारीशक्तीचा नारा!
Solapur Nari Shakti : शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरालगतचे शौचालय कायमस्वरूपी हटवावे या मागणीसाठी विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येत शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारीशक्तीने महाआरती केली
प्रभुलिंग वारशेट्टी
Solapur: शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णू घाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे. ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे. हे शौचालय कायमस्वरूपी येथून हटवावे या एकत्रित मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारीशक्तीने महाआरती केली.

