सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील खुल्या जागेवरील युजर चार्जेस रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे पाठवला आहे. तसेच, शहरात तब्बल 7951 मिळकतींचा पत्ताच नाही, त्या यादीतून कमी करण्याचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर 30 जानेवारीला होणाऱ्या सभेत निर्णय अपेक्षित आहे.
हेही वाचा - राज्यातील आमदारांना 144 कोटींचा बोनस
62623 खुल्या जागा
शहर व हद्दवाढ भागात 62623 खुल्या जागा आहेत. त्या ठिकाणी ड्रेनेजची सुविधा नाही, तरीसुद्धा या खुल्या जागेवर युजर चार्जेस आकारण्यात आलेला आहे. त्याची रक्कम जवळपास 17 कोटी 59 लाख रुपये आहे. खुल्या मिळकतींना ड्रेनेजची सुविधा देण्याची गरज नाही, त्यामुळे या मिळकतींना लावण्यात आलेला युजर चार्जेस रद्द करावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे.
हेही वाचा - कुंपणच खाई शेत त्याला नाही लाज
7951 मिळकती अढळत नाहीत
शहर व हद्दवाढ भागात सुमारे 7951 मिळकती अढळ झालेल्या नाहीत. मात्र त्यांची नोंद महापालिकेत आहेत. या मिळकतींपोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी दिसून येते. मात्र मिळकतीच अस्तित्वात नसल्याने त्यांच्यापासून कराचे उत्पन्न मिळत नाही, मात्र अंदाजपत्रकात ते अपेक्षित धरले जाते. त्यामुळे थकबाकीचा आकडा विनाकारण फुगतो. परिणामी वसुली कमी दिसते. त्यामुळे या मिळकतींची नोंद रजिस्टरमधून काढण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.