
पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरातील 40 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड लसीकरण नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) नगरपालिकेच्या वतीने शहरातील 40 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड लसीकरण (Covid Vaccine) नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. सोमवार (ता. 26) पासून लसीकरणासाठी (Vaccination) नोंदणी सुरू झाली असून शहरातील नागरिकांचा या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूर शहरातील वय वर्षे 40 पासूनवरील नागरिकांना सोमवार ते शुक्रवारी सकाळी 8.30 ते 11.30 या कालावधीत लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. (Vaccination registration campaign for citizens above 40 years of age at Pandharpur-ssd73)
लसीच्या प्रथम डोससाठी नोंदणी केंद्र : 1) विवेक वर्धिनी प्रशाला (काळा मारुती चौक), 2) द. ह. कवठेकर प्रशाला (तालुका पोलिस स्टेशन मागे)
लसीचा दुसरा डोस नोंदणी : 84 + दिवस पूर्ण झालेले नागरिक (वयाचे बंधन नाही)
नोंदणी केंद्र : 1) कवठेकर प्रशाला (नाथ चौक), 2) कर्मयोगी विद्या निकेतन (लिंक रोड) लसीकरणाच्या नोंदणीनंतर टप्प्या- टप्प्याने लसीकरणासाठी नागरिकांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. शहरातील नागरिकांनी या यादीमध्ये आपली नावे आल्यानंतर खालील लसीकरण केंद्रामध्ये आपले आधार कार्ड सोबत घेऊन लसीचा डोस घेण्यासाठी जावे, असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले आहे.
लसीकरण केंद्र
प्रथम डोस लसीकरण केंद्र : अरिहंत पब्लिक स्कूल (मनीषा नगर)
दुसरा डोस लसीकरण केंद्र : आर्दश प्राथमिक विद्यालय (भक्ती मार्ग)
कोविड 19 लसीकरण नोंदणी करण्यासाठी येताना नागरिकांनी केंद्र शासनाच्या www.cowin.gov.in या वेब पोर्टलवर नाव नोंदणी करून आलेला रजिस्टर नंबर व आधार कार्ड सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.
- अरविंद माळी, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.