Mother's Day : आईच्या मैत्रीने दिला आत्मविश्वास; एमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकी सेवेत वैष्णवी गायकवाड राज्यात प्रथम
Mother's Day Special Story: आईच्या प्रेम आणि मैत्रीच्या आधारावर, एमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकी सेवेत राज्यात पहिलं स्थान मिळवणाऱ्या वैष्णवी गायकवाड यांनी आपला संघर्ष आणि यशाची कथा 'सकाळ' शी शेअर केली
Solapur News: प्रत्येक आईसाठी आपली मुलं सर्वस्वी असतात. त्यांच्या यशासाठी अहोरात्र मेहनत घेतात. माझी आई भारती गायकवाड व वडील राम गायकवाड हे दोघेही शिक्षक आहेत. वडील शिक्षकी पेशासोबत सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही काम पाहतात.