

सोलापूर : उन्हाळ्यात कमी श्रम केले तरी, घामावाटे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा स्थितीत गारवा देण्याबरोबरच शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचे काम वाळा करतो. उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. मात्र फ्रिजचे पाणी पिल्यानंतर तब्येत बिघडण्याची शक्यता असते.