

Vat Purnima
सोलापूर - आज (वटपौर्णिमेनिमित्त) सुवासिनींचा अत्यंत श्रद्धेचा आणि पारंपरिक महत्त्व असलेला वटसावित्रीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी विवाहित महिला हे व्रत श्रद्धाभावाने पाळतात. त्यामुळे पूजेसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी शुभ मुहूर्ताची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.