वीरशैव मठांनी मला आसरा दिला - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath
वीरशैव मठांनी मला आसरा दिला - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

वीरशैव मठांनी मला आसरा दिला - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

सोलापूर - मी लहानपणापासून संतपरंपरेमध्ये कार्य करीत फिरत असताना आणि नंतर राजकारणात (Politics) प्रवेश घेतल्यानंतर राजकीय कार्यक्रमासाठी देशभर फिरत होतो. त्यावेळी मला कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील वीरशैव पंथांच्या मठांनी (Veerashaiva Math) मला आसरा (Shelter) दिला असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले.

वाराणसी येथे आयोजित विश्व वीरशैव महासम्मेलन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, उत्तर प्रदेशचे मंत्री दयाशंकर मिश्रा, माजी आ. मंजुनाथ कुन्नूर, आ. इरण्णा चरत्तीमठ, काशीचे आ. रवींद्र जयस्वाल, काशीच्या महापौर मृदुला जयस्वाल, माजी आ. विश्वनाथ चाकोते, मंद्रूपचे रेणूक शिवाचार्य, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य स्वामी, श्रीकंठ शिवाचार्य स्वामी, होटगी मठाचे उत्तराधिकारी योगीराजेंद्र शिवाचार्य स्वामी, यांच्यासह देशभरातील शिवाचार्य, संत-महंत, आचार्य आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ पुढे बोलताना म्हणाले की, काशीपीठाला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. या पीठाने सुरुवातीपासूनच धर्म कार्याबरोबरच सामाजिक योगदान दिले आहे. यामुळे पिठाचे कार्य कौतुकास्पद आहे, याप्रसंगी सचिव शांतय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, प्रभुराज विभुते, दिलीप दुलंगे, राजेंद्र गंगदे, माजी सभागृह नेता शिवानंद पाटील, विराज पाटील, प्रतिक थोबडे, सिद्रामप्पा हुलसुरे, विकास हिरेहब्बू, वीरशैव व्हिजनचे राजशेखर बुरकुले आदी उपस्थित होते.

Web Title: Veerashaiva Math Gave Me Shelter Yogi Adityanath

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurYogi Adityanath
go to top