मंगळवेढा शहरातील भाजीपाला विक्रेते बसले एकाच ठिकाणी 

Vegetable sellers in the city of Mangalwedha sat in one place
Vegetable sellers in the city of Mangalwedha sat in one place
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता सध्या नगरपालिकेच्या आठवडा बाजारातील शेड रिकामे ठेवून पालेभाजी विक्रेते रस्त्यावर बसून पालेभाजी विक्री करतात. यामुळे सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडत असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध करताच नगरपालिकेने सर्व विक्रेत्यांना सोशल डिस्टन्स ठेवत रिकाम्या शेडमध्ये भाजी विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ऐन पावसाळ्यात व्यापारी व ग्राहकांची सोय झाली. 
येथील नगरपालिकेच्या वतीने अद्ययावत बाजार कट्टे तयार करून निवारा शेड व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा या ऋतूत बाजार दिवशी विक्रेत्यांना सुरक्षितपणे मालाची विक्री करता येऊ लागली आहे. परंतु, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने जमावबंदीचा आदेश देऊन आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते. ताजी पालेभाजी उपलब्ध व्हावी याकरिता नगरपालिकेच्या वतीने विक्रेत्यांची आठवडा बाजाराच्या निवारा शेड येथे भाजी विक्रीसाठी न बसवता अन्य ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली. मात्र, उघड्यावर रस्त्यालगत बसून पालेभाजी विक्री करताना लगतच्या दुर्गंधीसह सोशल डिस्टनचा बोजवारा उडत होता. तसेच कारवाईच्या भीतीने पळून जाणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीमागे नगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यांच्या मागे खरेदी करणारे, असे चित्र गल्लीबोळातून पाहण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसांचा विचार करता नगरपालिकेच्या बाजार कट्ट्यावर पालेभाजी विक्रेत्यांची व्यवस्था केल्यास माल सुरक्षित राहून विक्री होईल. त्यादृष्टीने नगरपालिकेने विचार करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत नगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com