सोलापूर जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित !

चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार
सोलापूर जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित !

माळीनगर (सोलापूर) : जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तत्काळ मदत मिळणार आहे.चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून

जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज माळशिरस तालुक्यातील सर्व गावातील पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे यांनी उपस्थितांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले.सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात या यंत्रणेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. गेल्या नऊ वर्षात पुणे,नाशिक,सातारा,अहमदनगर जिल्हयातील 3 हजार 500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत.ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत.संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरीत मोबाईलवर ऐकू जातो.परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

सोलापूर जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित !
भीमा पाणलोट तुडुंब; 'उजनी'ला प्रतीक्षा !

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,उपसभापती प्रतापराव पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु,अकलुजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर,पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड (माळशिरस),भगवान खारतोडे (वेळापूर) सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, विक्रमसिंह घाटगे,उत्तम सुतार उपस्थित होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेचे उद्दिष्ट-

  1. घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे

  2. गावातील कार्यक्रम,घटना विनाविलंब नागरीकांना एकाच वेळी कळणे

  3. अफवांना आळा घालणे

  4. प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे

  5. पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये -

  1. संपुर्ण स्वयंचलित यंत्रणा

  2. गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत

  3. संपुर्ण भारतासाठी एकच टोल फ्री नंबर 18002703600

  4. यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करु शकतो

  5. संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश काॅल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो

  6. दुर्घटनेेचे स्वरुप,तीव्रता,ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबध्द मदत करता येते

  7. नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारित होतात

  8. नियमबाहय दिलेले संदेश,अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत

  9. एका गावात चोरी करुन चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य

  10. वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किलोमीटर परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो

  11. घटनेच्या तीव्रतेनुसार काॅल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते

  12. संदेश पुढील एक तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय

  13. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय

  14. चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅक लिस्ट होतात

  15. गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकांचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात

  16. सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा

  17. विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना,आदेष देता येणे शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com