शिवणीला गावाला सीना नदीच्या पाण्याचा वेढा

Shivni Villege in Solpaur Distriect
Shivni Villege in Solpaur Distriect
Updated on

दक्षिण सोलापूर : उजनी व कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना नदीला महापूर आल्याने शिवणी (ता.उत्तर सोलापूर) हे
संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. नदीकाठच्या शेतातील वस्तीवरील शेळ्या, म्हशी, गाईसह अन्य सुमारे 100 जनावरांचा जीव धोक्‍यात आहे. पाण्याच्या नदीवरील मोटारी, शेतातील संपूर्ण पिकासह शेतातील माती वाहून गेली आहे. गावातील सर्व कुटुंबिय गावातच अडकले आहेत. गावाला पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला आहे. गावातून बाहेर पडणाऱ्या मार्गावर सहा ते सात फूटापेक्षा अधिक पाणी आहे. त्यामुळे गावातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग पूर्णत: बंद झाले आहेत.

सीना नदीची पाणीपातळी अतिशय झपाट्याने वाढत असून दुपारनंतर संपूर्ण गाव पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. येथे बाहेरून कोणतीही मदत पोहोचणे दुरापास्त होत चालले आहे. जिल्हाधिकारी, तहसिलदार, व आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी कसला ही संपर्क होत नाही. त्यामुळे शासकीय मदत अद्यापपर्यंत आलेली नाही. बुधवारी रात्री पासून लोक उपाशी आहेत. चुली पेटवायलाही तळहातभर जागा शिल्लक राहिलेला नाही. सर्व गावात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे येथे तातडीने मदत पोहोचणे आवश्‍यक आहे.

संपादन : अरविंद मोटे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad pawar and mla abhijit patil
Solapur Development Work Hit By Election Code Of Conduct With 1483 Crore Water Project And 1024 Crore Flyovers Delayed
Barshi Farmers Raise Water Crisis Before Devendra Fadnavis Seek Permanent Water As Drought Impacts Farming And Families
mohol police pujari trusti meeting
Marathi News Esakal
www.esakal.com