अपघाताचे प्रमाण वाढलेल्या फूट रस्ता येथे गतिरोधकच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता-रोको 

Pdr Rasta Roko
Pdr Rasta Roko
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - कराड या नव्या राज्य मार्गावरील फूट रस्ता (कोर्टी) येथे गतिरोधक करावा, या मागणीसाठी आज (गुरुवारी) आमदार गोपीचंद पडळकर विचार मंचचे जिल्हा अध्यक्ष संजय माने यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. 

सुमारे तासभर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे तासाभरानंतर पोलिस आल्यानंतर निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. 

पंढरपूर - कराड या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. रस्ता चांगला झाल्याने वाहने बेफाम वेगाने जात आहेत. त्यामुळे फूट रस्ता येथे आपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये 16 अपघात झाले आहेत. यामध्ये निष्पाप सहा जणांचा बळी गेला आहे. 

अलीकडेच फूट रस्ता येथे संग्राम कृष्णा वाघमोडे या शाळकरी मुलाला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. येथे वारंवार अपघात घडले आहेत. येथील ग्रामस्थांनी गतिरोधक करावा अशी लेखी मागणी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे, तरीही या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज येथील ग्रामस्थांनी कोर्टी येथील फूट रस्ता येथे सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. 

आंदोलनामध्ये बापू वाघमोडे, रघुनाथ पवार, भारत पवार, चिमाजी शिंदे, अनिल विटकर, सूरज पवार, केतन कोळेकर, महेश देवकर, नीलेश पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सार्वजिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता के. एम. मुलाणी यांना लेखी निवेदन दिले. या वेळी श्री. मुलाणी यांनी लवकरच गतिरोधक केला जाईल, असे आश्वासन दिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com