Komal Dhoble : महिलांवरील हिंसाचार भारतीय संस्कृतीला कलंक : अॅड कोमल ढोबळे-साळुंखे; 'द्रौपदी'चा आवाज ऐकण्याची गरज
Solapur News : घरगुती हिंसा, महिलांवरील अन्याय अत्याचार हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे. आजही आपल्या समाजात स्त्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ज्वलंत आहे. प्रगतीच्या, शिक्षणाच्या आणि जागरूकतेच्या अनेक गोष्टी बोलल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात घरगुती हिंसेचे प्रमाण वाढतेच आहे.
Adv. Komal Dhobale-Salunkhe addresses gender injustice; urges society to listen to the voice of ‘Draupadi’ against violence.Sakal
मंगळवेढा : 'ऑपरेशन सिंदूर' अशा मोहीमांचे कौतुक करताना, आपण आपल्या घरातील 'द्रौपदी'चा आवाज ऐकण्याची आणि तिच्या पाठिशी एकत्र उभं राहण्याची गरज असल्याचे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल ढोबळे-साळुंखे यांनी व्यक्त केले.