
सोलापूर : भीम गीतांच्या शेवटी गायकाने दिलीप फडतरे व नवनाथ क्षीरसागर यांचे नाव घेतले. तुम्ही त्यांचे नाव का घेतले? म्हणून रौनक गायकवाड याने गोंधळ घालत कार्यक्रम बंद करा, असे ओरडू लागला. कार्यक्रम सर्वांचा आहे. बंद करू नका असे सांगणाऱ्या युवकाला, गोंधळ थांबविण्यास गेलेल्यांना धारदार शस्त्राने व फायटरने मारहाण झाली. याप्रकरणी दिलीप रोहिदास फडतरे (वय ५०, रा. गंगानगर, लक्ष्मीपेठ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.