
सोलापूर : विषाणूजन्य मेंदूज्वराने शहरातील मोदीखाना परिसरातील दोन चुलत बहिणींचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याच कुटुंबातील एका मुलीवर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ती शुद्धीवर आहे. जिया महादेव म्हेत्रे (वय १५), ममता अशोक म्हेत्रे (वय १३) अशी मृत मुलींची तर जयश्री महादेव म्हेत्रे (वय १७) असे उपचार सुरू असलेल्या मुलीचे नाव आहे.