
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणारे मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि व्हीआयपींचा सत्कार करण्यासाठी मंदिर समितीने एक राजशिष्टाचार व सत्कार समिती गठित केली आहे. यामध्ये मंदिर समितीच्या पाच विभाग प्रमुखांची नियुक्ती केली आहे. यापुढे सत्कार समितीकडूनच व्हीआयपींचे सत्कार केले जाणार आहेत. मंदिर समितीमध्ये प्रथमच अशा प्रकारची सत्कार समिती नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.