नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिर सजले असून, मंदिरात आकर्षक फळा-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याने, विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
पंढरपूर : नववर्षानिमित्त (New Year 2025) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात (Vitthal-Rukmini Temple Pandharpur) पाच हजार संत्र्यांची आणि विविध फुलांची आकर्षक सजावट केली आहे. ही सजावट आळंदी येथील विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकूर यांनी मनोभावे केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून ठाकूर नवीन वर्षाच्या निमित्ताने विविध फळांची आरास करतात.