
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मार्जिन लोनचे ४८ कोटी रुपये देण्याचा आदेश सहकार विभागाने दिला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मार्जिन मनी लोन योजनेतून या कारखान्याला २६७ कोटी ६९ लाख रुपये मंजूर आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ४८ कोटी रुपये राखून ठेवले आहेत तर ४८ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.