
पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपच्या खांद्यावर देण्यात आली आहे. रक्षक कंपनीचा ठेका रद्द करण्यात आल्यानंतर यापुढे बीव्हीजी ग्रुपकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.