Solapur News
Solapur Newssakal

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी ३१ मार्चला मतदान! जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर, पण...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्र. एकच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केला आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार असून ३१ मार्च रोजी मतदान होणार आहे.

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्र. एकच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केला आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार असून ३१ मार्च रोजी मतदान होणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत नेहमीच चुरस पाहायला मिळाली आहे. सर्वात जुनी व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या कर्मचारी पतसंस्थेचा संचालक होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. साडेआठ वर्षांनंतर निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी सध्या ९१६ जण पात्र ठरले आहेत. थकबाकीदार सभासद व सभासद होऊन १ जानेवारी २०२४ रोजी दोन वर्षे पूर्ण न झालेल्यांना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, या पतसंस्थेचे भाग भांडवल १६ कोटी सहा लाखांपर्यंत असून बचतठेव सहा कोटी ६४ लाखांची आहे. संस्थेचा राखीव निधी तीन कोटींपर्यंत असून गतवर्षी संस्थेला एक कोटी दहा लाख रुपयांचा नफा देखील झाला आहे. विद्यमान संचालकांना पुन्हा एकदा आम्हीच जिंकणार असा विश्वास आहे. तर विरोधी पॅनेलने आतापासूनच पतसंस्थेवर आपली सत्ता यावी, यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. पण, पतसंस्था कोणाच्या ताब्यात येणार हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.

पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज भरणे : २७ फेब्रुवारी ते ४ मार्च

  • उमेदवारी अर्जांची छाननी : ५ मार्च रोजी

  • पात्र अर्जांची यादी प्रसिद्ध : ६ मार्च रोजी

  • उमेदवारी अर्ज माघार : ६ ते २१ मार्च

  • मतदान : ३१ मार्च (सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत)

  • मतमोजणी : मतदान संपल्यावर त्याच दिवशी

आचारसंहितेमुळे निवडणूक होईल का?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपर्यंत लागू शकते, असा अंदाज आहे. निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी असते. तत्पूर्वी, त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्र.एकची निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार का, याबद्दल साशंकता आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला आचारसंहितेची अडचण येवू शकते का, यावर सध्यातरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी स्पष्टपणे सांगू शकत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com