
रामेश्वर विभूते
Solapur: आपले आराध्य दैवत कोणतेही असो, त्याची नित्यसेवा आपल्या हातून घडो, अशी आपली मनोमन इच्छा असते. अभिषेक, निवासी सेवा, रुद्र, होमहवन यासह मानस पूजेलाही तितकेच महत्त्व आहे. त्यातच तिरुपतीतील बालाजीच्या मंदिरात बसून हुंडीतील पैसे मोजण्याची सेवा म्हणजे अहोभाग्यच. याला ‘परकामणी सेवा’ म्हणतात. आपल्यालाही तेथे जात ही सेवा देता येते, यात सहभागी होत नोंदणी कशी करायची हे वाचाच.