प्रभाग सहाची लागली पोटनिवडणूक ! आठजण इच्छूक; प्रारुप मतदार यादीचे काम सुरु

1Vote_13.jpg
1Vote_13.jpg
Updated on

सोलापूर : शिवसेनेच्या नगरसेविका वल्सला बरगंडे यांच्या निधनाने प्रभाग सहामधील शिवसेनेची जागा रिक्‍त झाली. आठ-दहा महिन्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या दृष्टीने आदेश दिले आहेत. आता त्यांच्या प्रभागातील प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु झाले असून अंतिम यादी तयार झाल्यानंतर मार्चमध्ये निवडणुकीची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कोठेंच्या पक्षांतरानंतर शिवसेकडून बी प्लॅनची तयारी 
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात असलेल्या कोठेंना शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी उमेदवारी मिळू दिली नाही, अशी चर्चा आहे. त्यानंतर पक्षातील अंतर्गत वादामुळे कोंडी झालेले महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकमेकांचे नगरसेवक, नेते भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षात घ्यायचे नाही, असे ठरले. त्यामुळे कोठे यांच्यासोबत त्यांचे नऊ-दहा समर्थक नगरसेवक शिवसेनेतच राहिले. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी तेही पक्षांतर करतील, अशी शक्‍यता पक्षातील नेतेमंडळींना वाटत आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने महापालिकेतील पक्षाचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकारमुळे त्या समर्थक नगरसेवकांनी पक्षांतर न केल्यास पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्याचीही तयारी असल्याची चर्चा आहे. 

महापालिकेत शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून प्रभाग सहामधील बरगंडे यांची जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी अनेक इच्छुकांची गर्दी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व गणेश वानकर यांच्याकडे वाढू लागली आहे. बरगंडे यांच्या कुटुंबातील एक महिला सदस्य त्याठिकाणाहून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र, भाजपने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे शिवसेनेकडून त्या जागेसाठी सात-आठ इच्छुक असल्याची चर्चा असून त्यातून अद्याप नाव निश्‍चित झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com