
बरड : खांद्यावरील भगव्या पताका उंचावत, टाळ- मृदंगाचा गजर करत आणि मुखाने हरिनामाचे गोडवे गात शेतशिवराचा आनंद घेत वारकऱ्यांची आजची वाटचाल सुखद झाली. कधी ढगाळ, कधी ऊन तर कधी पाऊस अशा वातावरणात आजचा प्रवास झाला. दरम्यान, सोहळा सोमवारी (ता. ३०) सातारा जिल्ह्यातील प्रवास करून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.