वारकरी संप्रदायाने घेतली श्रीश्री रविशंकर यांची भेट I Sri Sri Ravi Shankar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravishankar

वारकरी संप्रदायाने घेतली श्रीश्री रविशंकर यांची भेट

पंढरपूर (सोलापूर) - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व विश्वविख्यात अध्यात्मिक गुरु श्रीश्री रविशंकरजी यांची वारकरी संप्रदायातील फडकरी व अन्य प्रमुखांनी आज बंगळुरू येथे भेट घेतली. यावेळी चंद्रभागा माता मंदिराचा जीर्णोद्धार आदींसह अन्य काही विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. ही भेट आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्र विश्वस्त शेखर मुंदडा यांनी घडवून आणली.

यावेळी देवव्रत (राणा) महाराज वासकर, रघुनाथमहाराज कबीर महाराज गोसावी, उद्धव महाराज पैठणकर, महादेवमहाराज बोराडेशास्त्री, शाम महाराज उखळीकर, रंगनाथस्वामी महाराज राशीनकर, महेश काका भिवरे, अक्षयमहाराज भोसले आदी उपस्थित होते. अक्षय महाराज भोसले यांनी प्रास्ताविक करत पूज्य गुरुजींना संत व फड परंपरा यांची माहिती उपलब्ध करुन देत परिचय करुन दिला.

हेही वाचा: सोलापूर : ई-पीक पाहणी कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

पंढरपूर येथे चंद्रभागा मातेचे पुरातन मंदिर असून सध्या ते जीर्ण अवस्थेत आहे. शेखर मुंदडा व सहकारी परिवाराच्या माध्यमातून या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत आहे. दस्तावेज व माहिती संकलन कार्य जवळपास पूर्ण होत आले आहे. लवकरच कार्यास प्रारंभ होणार आहे. सदर मंदिराच्या कार्यात पूज्य गुरुजींनी लक्ष देऊन त्यासाठी पंढरपूरला यावे, अशी विनंती उपस्थित प्रमुख मंडळींनी केली.

कार्य मंदिरापुरते मर्यादित न राहता चंद्रभागा नदी पुनर्जीवन याबाबत काही विशेष मोहीम कार्य करण्याचे संकेत पूज्य गुरुजींनी दिले. स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील युवा पिढीसाठी उद्योजकता अथवा त्यांच्या आवडीने उत्तम काम त्यांना स्वतःला निर्माण करता येईल, यासाठी आपण नक्की प्रयत्न करु, असे आश्वासन गुरुजींनी दिले.

टॅग्स :sri sri ravi shankar