esakal | विठ्ठला, जग कोरोनामुक्त कर..! 40 किलोमीटर दंडवत; वारकऱ्याची अनोखी भक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठला, जग कोरोनामुक्त कर..! 40 किलोमीटर दंडवत; वारकऱ्याची अनोखी भक्ती

सोलापूर जिल्हयातील मोडनिंब येथील श्री विठ्ठलभक्त नागनाथ कोळी आणि त्यांची पत्नी जयश्री कोळी हे दांपत्य लऊळ येथून लोटांगण घालत पंढरपूरकडे निघाले आहेत.

विठ्ठला, जग कोरोनामुक्त कर..! 40 किलोमीटर दंडवत; वारकऱ्याची अनोखी भक्ती

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनामुळे (Corona) अख्खं जग वेठिला धरलं गेलं आहे. यात मंदिरेही सुटली नाहीत. अनेक मंदिरे गेल्या वर्षापासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहेत. मात्र भाविक देवांच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी व वारीसाठी शासनाने या वर्षीही बंधने घातली आहेत. त्यामुळे जगाला कोरोना मुक्त कर, श्री विठ्ठल मंदिर (Shri Vitthal Mandir )दर्शनासाठी खुलं करावं, पायी वारीला परवानगी द्यावी आदी मागण्या करत अन साकडं घालण्यासाठी सोलापूर जिल्हयातील मोडनिंब येथील श्री विठ्ठलभक्त नागनाथ कोळी (Naghnath koli)आणि त्यांची पत्नी जयश्री कोळी (Jayshri koli) हे दांपत्य लऊळ येथून लोटांगण घालत पंढरपूरकडे निघाले आहेत. (warkari set out to visit vitthal rakhumai of pandharpur)

हेही वाचा: पंढरपूर मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते भाविकांच्या प्रतिक्षेत!

कोळी हे शेतकरी कुटुंबातील असून श्री विठ्ठल - रखुमाईचे ते निस्सीम भक्त आहेत. दरवर्षी वारीला न चुकता हजेरी लावणाऱ्या या दांपत्याला यंदा वारी भरणार नसल्याचे अत्यंत दुःख आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा, पायी वारीला शासनाने अटी व शर्थीवर परवानगी द्यावी असं साकडं घालण्यासाठी हे दांपत्य लऊळ या संत भूमीतून पंढरपूरकडे निघाले आहे.

हेही वाचा: महूद-पंढरपूर रोडवर पकडला 63.61 लाखांचा गांजा

लऊळ ही संत कूर्मदास महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीत श्री विठ्ठलाने संत कूर्मदास यांना दर्शन दिले होते. कोळी दांपत्याने संत कूर्मदास महाराजांचे दर्शन घेऊन आपला संकल्प सोडला आहे. लऊळ ते पंढरपूर हे 40 किलोमीटरचे अंतर दंडवत घालीत 5 दिवसांत पूर्ण करणार आहेत. मंगळवारी (ता.15) जून रोजी त्यांनी प्रस्थान ठेवले आहे. त्यांच्या संकल्पात भाविकांनी बाधा आणू नये, कोणीही गर्दी करु नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन कोळी यांनी केले आहे. (warkari set out to visit vitthal rakhumai of pandharpur)

loading image