Mangalwedha News : खा. प्रणिती शिंदेच्या प्रयत्नाने वाढणार डोंगरगाव तलावात पाणीसाठा

मंगळवेढा तालुक्यातील नदी, कालवा आणि म्हैसाळचे लाभक्षेत्र वगळता तालुक्यातील अन्य भाग हा दुष्काळी संकटाला सामोरे जात आहे.
Dongargaon Lake
Dongargaon Lakesakal
Updated on

मंगळवेढा - पाणी फौडेशन, जलयुक्त शिवार या योजनेच्या धर्तीवर पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील डोंगरगाव येथे सुरू असलेल्या जलसंधारणाची कामातून नव्याने 9 कोटी लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा वाढणार आहे.

तालुक्यातील नदी, कालवा आणि म्हैसाळचे लाभक्षेत्र वगळता तालुक्यातील अन्य भाग हा दुष्काळी संकटाला सामोरे जात आहे. आणि ही समस्या पिढ्यान पिढ्या भेडसावत असून त्या सोडवण्याच्या दृष्टीने ठोस काम झाले नाही.

मात्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षात त्याचे काम या दुष्काळी गावात झाले त्याचा परिणाम काही अंशी गावात दिसून आले. मात्र इतर क्षेत्रावर म्हणावा तसा परिणाम झालेला नाही.

म्हणून खा. प्रणिती शिंदे यांच्या पुढाकाराने देशातील १८ राज्यांमध्ये कार्यरत पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडिया (E. F. I.) ही वन्यजीव संवर्धन आणि अधिवास पुनर्संचयन संस्थेच्या माध्यमातून सध्या प्रायोगिक तत्वावर डोंगरगाव येथील तलावाचे तलावातील गाळ काढण्याचा काम सुरू असून, या तलावामध्ये 100 बाय 50 मीटर व उंची दीड मीटर खोलीचे असे बारा छोटे छोटे साठवण तलाव तयार करून ते एकमेकांशी जोडण्यात येणार आहे.

त्यामुळे पडलेले पाणी या सर्व छोट्या छोट्या तलावात येऊन पाणीसाठा वाढण्यास व जिरण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी पक्षांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्यामुळे पक्षांचा देखील वावर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देखील छोट्या छोट्या तलावाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध राहणार आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर डोंगरगाव व लक्ष्मी दहिवडी या गावाची निवड केली असून उर्वरित अन्य गावात देखील अशा पद्धतीने कामे करून त्या गावाचा दुष्काळ हटवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

- खा. प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदार संघ

दुष्काळ मुक्त गावासाठी खा. प्रणिती शिंदे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून डोंगरगाव तलावातील काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचे परिणाम पुढच्या वर्षी दिसून येतील मात्र सध्या सुरू असलेल्या कामात निघणारी काळी माती ही शेतकऱ्यांना नवीन सुपीक जमीन तयार करण्यासाठी देण्यात यावी.

- डॉ. नंदकुमार शिंदे सामाजिक कार्यकर्ते

दुष्काळमुक्त गाव तयार करण्यासाठी यापूर्वीच्या खासदाराकडून प्रयत्न अपेक्षित होते. परंतु तेच प्रयत्न सध्या खासदार प्रणिती शिंदे करीत आहेत ही बाब चांगली आहे. त्यांच्या प्रयत्नाला ग्रामस्थाची देखील साथ मिळाल्याने सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील.

- प्रशांत साळे तालुकाध्यक्ष काँग्रेस

असे होणार काम

  • तलावांमधील कचरा, अवशेष आणि अतिक्रमित वनस्पतींचे स्वच्छता कार्य

  • तलावांचे गाळनिर्मूलन आणि खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवणे

  • जलभरण विहिरी, पक्षी निवास द्वीपे आणि झिरप गटारांची निर्मिती

  • पावसाळ्यानंतर स्थानिक प्रकारच्या वनस्पती लावणे

  • तलावात येणाऱ्या प्रवाहाचे आणि अतिरिक्त पाण्याच्या नियंत्रणाचे व्यवस्थापन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com