Solapur : पाणीपुरवठ्याच्या मास्टर प्लॅनला; खंडित विजेचा ‘शॉक’!

विजेचा सततचा लपंडाव; महापालिका बेजार तर नागरिकांचे पाण्यासाठी हाल
Water Supply Master Plan shock interrupted electricity
Water Supply Master Plan shock interrupted electricityesakal

सोलापूर : शहराला सुरळीत व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी शहराचा इतिहास अन्‌ भूगोल जाणून घेत आयुक्तांनी शहराचे पाच विभाग करत मार्चअखेर पाणी पुरवठ्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला.

मात्र, एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वारंवार वीज खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. महापालिकेच्या मास्टर प्लॅनला अवकाळीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.

Water Supply Master Plan shock interrupted electricity
Solapur News : तुम्ही निधी मागायला कमी पडू नका मी द्यायला कमी पडणार नाही; समाधान आवताडे

मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या पाणीटंचाईमुळे लोकप्रतिनिधी, आजी-माजी सदस्य, नागरिक प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. आयुक्त शीतल तेली-उगले यांनी शहर पाणीपुरवठ्याचा इतिहास अन्‌ भूगोल जाणून घेण्यासाठी विभागप्रमुख व सर्व कनिष्ठ अभियंत्यांची बैठक घेतली. या बैठकीत पाणी वितरणातील अडचणी व आव्हाने यांचा सूक्ष्म अभ्यास केला.

त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कृती आराखडा तयार केला. यामध्ये पाणीपुरवठ्यासाठी शहराचे पाच विभाग करण्यात आले. त्यांचे वेळापत्रक बनविण्यात आले. संबंधित टाकीवरून कोणत्या वारी, कोणत्या नगरांना पाणीपुरवठा केला जाणार, याचेही नियोजन केले.

तसेच संबंधित परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याशी संबंधित असलेले झोन अधिकारी, कनिष्ठ अभियंता, चावीवाला यांची नावे मोबाईल नंबरसह माहिती व्हावीत, यासाठी नोटीस बोर्डावर यादी जाहीर करण्यात आली. सरसकट चार दिवसांआड पाणी देण्याचे ठरविण्यात आले. परंतु या मास्टर प्लॅनला अवकाळीने नाट लावला असून, अवकाळीने वारंवार वीज खंडित होत असल्याने महापालिकेचे नियोजन कागदावरच राहिले आहे.

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु कोणत्याही कारणास्तव दहा मिनिटांसाठीही जरी मुख्य लाइनची वीज खंडित झाली तर पाइपमधील पाणी परत जाते. पुन्हा उपसा करण्याची नवीन प्रक्रिया राबवावी लागते. दहा मिनिटांच्या विजेच्या अडचणीमुळे तब्बल तासाभराची प्रक्रिया राबवावी लागते.

Water Supply Master Plan shock interrupted electricity
Solapur : प्रांत कार्यालयातील लाच प्रकरणानंतर मंगळवेढ्यात व्हायरल पोस्टची चर्चा

मग त्याचा परिणाम टाकी भरणे, पाणी वितरित करणे आदींवर होतो. काल (शनिवार) आणि आज (रविवार) असे दोन दिवसांत १३ तास वीज खंडित झाली होती. या तांत्रिक कारणामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे.

- संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

४०० हातपंपांची दुरुस्ती केली तरी....

शहरात एकूण तीन हजार ५८९ हातपंप आहेत. त्यापैकी तीन हजार ७६ चालू स्थितीत तर ४०० हातपंप नादुरुस्त होते. तर ११३ हातपंप कायमचे बंद आहेत. नादुरुस्त असलेले ४०० हातपंप दुरुस्त करून घेण्यात आले. ११३ हातपंप चालू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिका नागरिकांची पाणी समस्या दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करीत असली तरी, शहराची पाणी संकटाच्या चक्रातून सुटका होत नसल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com