रब्बीसाठी उजनीतून शुक्रवारपासून सोडणार पाणी; पालकमंत्री दत्तात्रय भरणे

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
Ujani Dam
Ujani DamEsakal
Updated on

सोलापूर : उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून २८ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक गुगल मीट ॲपद्वारे झाली.या बैठकीला आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, २८ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत डावा आणि उजव्या कालव्यातून पाच टीएमसी तर भीमा-सीना जोड कालव्यातून दीड टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. दहिगाव उपसा सिंचनसाठी २ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत ०.१५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी सीना-माढा प्रकल्पाला मार्चच्या पुढे पाणी सोडण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी मंजूर झाली. रब्बी हंगामात गाळ वजा जाता एकूण पाणीसाठा १२०.३४ टीएमसी तर उपयुक्त ५६.६८ टीएमसी साठा आहे. याची टक्केवारी ८५.०६ इतकी आहे. पहिल्या आवर्तनात ६.६५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

Ujani Dam
अतिवृष्टीग्रस्तांकडे गांभीर्याने लक्ष द्या; वेण्णा पूरग्रस्त समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यामध्ये सीना-माढा प्रकल्पाला मार्चनंतर पाणी सोडण्यात येणार आहे. बैठकीत उन्हाळ हंगामाचेही नियोजन झाले. उन्हाळ हंगामासाठी दोन आवर्तन असून यामध्ये पहिल्या आवर्तनामध्ये १६.९० टीएमसी तर दुसऱ्या आवर्तनात १७.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. शिवाय भीमा नदीला मागणी, परिस्थिती, पाणी साठ्याच्या उपलब्धेनुसार २५ फेब्रुवारीनंतर पाणी सोडण्यात येणार आहे. उजनी धरणात मार्चअखेर गाळ वजा जाता संभाव्य उपयुक्त पाणीसाठा १०६.७४ टीएमसी आहे. पाणी नियोजनाचे सादरीकरण श्री. साळे यांनी केले. यावेळी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. तु. धुमाळ, अधीक्षक अभियंता आणि प्रशासक डी. बी. साळे, उजनी धरण व्यवस्थापकचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे, भीमा विकास विभागचे कार्यकारी अभियंता आर. एन. क्षीरसागर यांच्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील कालवा सल्लागार समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

Ujani Dam
लस न घेतलेले तब्बल एक हजारावर नागरिक पॉझिटिव्ह
  1. १ मार्चअखेर संभाव्य पाणी वापर- ५ टीएमसी

  2. बाष्पीभवन -४.५० टीएमसी

  3. जलाशय उपसा सिंचन -०.८५ टीएमसी

  4. जलाशय बिगर सिंचन (पिण्यासाठी) -०.५५ टीएमसी

  5. जलाशय बिगर सिंचन (औद्योगिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com