
सोलापूर : शहरातील निम्मे शहर प्रामुख्याने हद्दवाढ भागाला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आठवड्यातून एकदाच पाणी येते. त्या दिवाशी कोणाकडे मोटारीमुळे धबाधबा पाणी तर कुठे नुसतेच पाण्याची धार लागते. अशातच नोकरी, लग्नकार्य, दवाखाना, वीज गायब अशा काही कारणास्वत पाण्याचा एक वार हुकलाच तर मग पंधरा दिवसांनीच पाणी मिळते. पाण्याची भटकंती ही सोलापूरकरांसाठी नित्याचीच बाब बनली आहे. एकीकडे उष्माघात आणि दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाने सोलापूरकर होरपळून चालले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोलापूरची तहान भागविण्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी फेल ठरल्याचे दिसून येत आहे.