Ashadhi wari : विठ्ठल भक्तीचा लळा... आनंदाचा सोहळा...

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्र्वर महाराज शाही पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत
Welcome to great Shri Dnyaneshwar Maharaj Shahi Palkhi ceremony Natepute
Welcome to great Shri Dnyaneshwar Maharaj Shahi Palkhi ceremony Natepute

नातेपुते - उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे । पंढरी वांचूनी दुजा ठाव नाही ।। असे विठ्ठल दर्शनाच्या प्रेमाचे आर्त प्रगट करणारे दिंड्यामधून गायले जाणारे अभंग… डौलाणे फडकणाऱ्या पताका... डोळ्यांचे पारणे फेडणारी रथाला केलेली आकर्षक फुलांची सजावट... माउली... माउली... नामांचा अखंड जयघोष व पंढरीच्या सोलापूर जिल्ह्यात म्हणजेच लाडक्या विठुरायांच्या कुशीत आल्यांची भावना ठेवत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्र्वर महाराजांच्या शाही पालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांसह आज सकाळी पावणेबारा वाजता जिल्हात आगमन झाले. पाटबंधारे खात्याच्या विश्राम गृहाच्या मैदानावर या आनंद सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार जाधव, सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप ढेले, माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर, कुलसचिव डॉ. एस. के. पवार आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. रविवारी सकाळपासूनच हजारो वारकरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत होते. सकाळी ११.१५ वाजता माउलींच्या नगाऱ्यांचे पाठोपाठ माउलींच्या व स्वारांच्या अश्वांचे आगमन झाले. दिंड्यापाठोपाठ ११.४५ वाजता माउलींच्या रथाचे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माउलींचे पूजन करून स्वागत केले.

यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, चोपदार बाळासाहेब यांचा सन्मान करण्यात आला. सकाळी सहापासून लाखो वारकरी नातेपुतेच्या दिशेने येत होते. त्यामुळे प्रशासनाने नातेपुते-फलटण मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करून नातेपुते-दहिगावमार्गे वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे या मार्गाने सकाळी साडेनऊ वाजता जिल्ह्यातील विविध खात्यातील अधिकारी स्वागताच्या ठिकाणी हजर झाले होते. स्वागताच्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्य आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या माता बालक केंद्र, विलगीकरण कक्ष, आरोग्य रथयात्रेचे उद्‌घाटन उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्यकारिकारी अधिकारी इशादिन शेळकरे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार जगदिश निंबाळकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, निवासी तहसीलदार तुषार देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदिनी आवडे, विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, पाटबंधारे विभागाचे अमोल मस्कर, भाजपच्या प्रदेश युवती आघाडी अध्यक्षा डॉ. पूनम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. माउलींना निरोप देण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक अक्षय बन्सल आदी मान्यवर उपस्थित होते. आळंदी संस्थानच्या वतीने सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला.

पुरंदावडेत आज रिंगण

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मंगळवारी (ता. ५) माळशिरसकडे रवाना होणार आहे. त्यापूर्वी पुरंदावडे येथे सोलापूर जिल्ह्यातील गोल रिंगण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पालखी माळशिरस येथे मुक्कामी दाखल होईल.

ठळक बाबी

  • राज्य शासनाच्या आषाढी यात्रा २०२२ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, बाळासाहेब चोपदार यांच्या हस्ते करण्यात आले.

  • माऊलींच्या सोहळ्यात यावर्षी सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त वारकरी असल्याचे आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील यांनी सांगितले

  • वारकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाऊस नसल्याने बहुतांश लोकांचे घसे बसले आहेत. धुळीचा वारकर्यांऱ्यांना मोठा त्रास होत आहे

  • वारकऱ्यांची संख्या वाढली तरी रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरळीत

  • नातेपुतेपर्यंत जोरदार पावसाची हजेरी

  • रस्त्याने रुग्णवाहिकांना ये-जा करण्यासाठी वारकऱ्यांनी दिला रस्ता

  • प्रशासनाच्या वतीने कोविड व इतर आरोग्य तपासणीची सुविधा

  • सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या रासेयो योजनेचे पथनाट्य सादर

  • सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्यदूत पथक देखील दिंडीत सहभागी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com