झाडातून पाणी पडते म्हणल्यावर नागरिकांनी केली तुडुंब गर्दी, प्रत्यक्षात कारण होतं नैसर्गिक 

SLC21B07710.jpg
SLC21B07710.jpg

सोलापूर : शनिवारचा दिवस .... त्यात अमावस्येचा म्हणजे शनिआमावस्या .... आणि झाडातून अचानक पाणी पडतंय ... म्हणल्यावर नागरिकांनी केली गर्दी आणि महिला वर्गाने तर सरळ नारळ फोडायला, हळदी कुंकू वाहायलाही सुरुवात केली. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण सोलापूर शहरपरिसरात पसरली. मात्र, झाडातून पाणी येणे हा कोणताही दैवी चमत्कार नसून तो एक नैसर्गिक नियम होता. 

या घटनेचा घटनाक्रम असा की, सोलापूर शहरातील बाळीवेस परिसरातील कस्तुरबा मार्केटसमोर असणाऱ्या देवकापुस (सावर) या झाडाच्या वाढलेल्या वरच्या बाजूतील फांदीमधून सकाळी सातच्या सुमारास अचानक पाण्याची संततधार लागली. हा जणू चमत्कार समजून पाहणाऱ्यांची गर्दी वाढत होती. कोणी म्हणत होते की ही दैवी शक्ती तर नव्हे ना... तर सामान्य महिलांमध्ये, महागाई वाढली आहे चांगल्या चांगल्या माणसांच्या डोळ्यातून पाणी पडत आहे,त्यात झाडाचं काय घेऊन बसलात ... अशी गमतीशीर चर्चा रंगली होती. परंतु काही वेळाने हे पाणी पडणे बंद झाले आणि जमलेल्या सर्वांच्याच चर्चेला विराम मिळाला. 

पाणी येण्याचे शास्त्रीय कारण 
 ज्या वेळी वातावरणात उष्णता वाढते तेव्हा झाडाच्या मूळापासून शोषले जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त असते. कारण वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. यामुळे झाडांच्या मुळापासून ते पानांपर्यंत पसरलेल्या जलवाहिन्या जास्त प्रमाणात पाणी शोषतात. जर या जलवाहिन्यांना कुठेतरी जखम किंवा इजा झाली असेल तेव्हा हे शोशलेले पाणी अतिदबावामुळे बाहेर पडते. 
- प्रा. जयराम भिडे, उपप्राचार्य, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय 

देवकापूस (सावर) या झाडातून पाणी येत असल्याचे सोलापुरातील खूप नागरिकांनी पाहिले. झाडातून पाणी येणे आश्‍चर्यकारक गोष्ट नाही. मोठं मोठ्या झाडांच्या मुळ्याजमिनीत खोलपर्यंत गेलेल्या असतात. त्याच मुळ्या जमिनीतील पाण्याचे शोषण करून फांद्या, पाने, फळापर्यंत पोहचविण्याचे काम करतात. काही ठिकाणी त्या झाडांच्या फांदी तुटली असेल किंवा त्यावरती घाव पडलेले असेल तर त्यातून पाणी निघते. 
उंबर, वड मोहाच्या झाडातून पाणी निघण्याचे आपण पाहत असतोच. 
-संतोष धाकपाडे 
वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन असोसिएशन, सोलापूर 

संपादन : अरविंद मोटे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com