पालकमंत्री दत्तात्रय भरणे मंगळवेढ्याचे पालकत्व कधी निभावणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dattatraya Bharane
पालकमंत्री दत्तात्रय भरणे मंगळवेढ्याचे पालकत्व कधी निभावणार!

पालकमंत्री दत्तात्रय भरणे मंगळवेढ्याचे पालकत्व कधी निभावणार!

मंगळवेढा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरच्या लाकडी निंबोडी पाणी योजनेला मुख्यमंत्र्याकडून हिरवा कंदिल घेतला. त्याच्या बरोबरीने असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला पालकमंत्री म्हणून हिरवा कंदील कधी मिळवणार असा सवाल मंगळवेढेकरातून विचारला जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासून राजकीय व्यासपीठावर तरंगत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मात्र मिळेना. 1999 ला राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न राजकीय व्यासपीठावर तरंगत आहे. सुरुवातीच्या काळात या भागाला तेलधोंडा व चाळीसधोंडा या उपसा सिंचन योजना प्रस्तावित केल्या. पण, शासनाने योजना या फिजिकल ठरवल्या. 2009 पासून दुष्काळी 35 गावासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना या नवीन योजना स्व. आ. भालके यांनी लोकांसमोर ठेवत शासनाकडे पाठपुरावा केला. 2014 ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून या योजनेला मान्यता घेत काँग्रेस प्रवेश केला. त्यानंतर राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे 2014 ते 2019 या कालावधीमध्ये या योजनेचे पाणी व गावे कमी करण्यात आले, पाणी व गावे कमी करून दाखल केलेला प्रस्ताव 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लागून परत आला. त्यानंतर राजकीय सत्ता बदलात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीच्या रूपाने नवीन राज्यात सत्तेचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर स्व. आ. भालके यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेऊन पाणी व गावे पूर्ववत ठेवण्यात यश मिळवले.

आजारपण आणि कोरोना साथीचा विळख्यात स्व. आ. भालके यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना विधिमंडळात त्यांच्या अपूर्ण योजनेला मार्गी लावणे ही त्यांना श्रद्धांजली ठरणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले होते. पोटनिवडणुकीपूर्वी या योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. या बाबतचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ला पंढरपूर येथे आ. प्रशांत परिचारक यांच्या प्रचारसभेच्या सुरुवातीलाच 35 गावांचा पाणी प्रश्न आम्ही सोडवतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर पोटनिवडणुकीत हे समाधान आवताडे यांना आमदार करा, केंद्रातून निधी आणून योजना मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. मात्र, त्यानी ही या प्रश्नावर साधा 'ब्र' शब्द देखील काढला नाही. दरम्यान, पंढरपुरात बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे शरद पवारांच्या हस्ते शुभारंभ भूमिपूजन करणार असल्याचे सुतोवाच केले. पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे पालकत्व घेवून मंजुरी कधी मिळणार याकडे लक्ष लागले.

Web Title: When Will Guardian Minister Dattatraya Bharane Fulfill The Guardianship Of Mangalwedha Politics Water Schemes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top