सोनेरी माळरानावर मिळाला पांढरा हिरा | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनेरी माळरानावर मिळाला पांढरा हिरा

सोलापूर : सोनेरी माळरानावर मिळाला पांढरा हिरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सध्या पक्ष्यांच्या समृध्दतेसाठी परिचित असलेले माळरान सुकलेल्या गवतामुळे सोनेरी रंगाचे बनले आहे. या सोनेरी रानात पांढरा हिरा दिसावा असे पांढुरक्‍या भोवत्याचे अस्तित्व शोभून दिसत आहे.

येथील पक्षी निरीक्षक संतोष धाकपाडे व सुरेश क्षीरसागर हे पक्षी निरीक्षणासाठी माळरानावर पोहोचले. माळरानावर सर्वत्र स्थलांतर पक्ष्यांची रेलचेल चालू होती. पायवाटेवरून तिरचिमणी गाडीच्या पुढे तुरुतुरु पळू लागलेली. मोठ्या पांगुळ चंडोलचा थवा इकडून तिकडून उडत होता. कोतवाल पक्षी आपली कोतवाली इमाने इतबारे करत होता. भोवत्या पक्षी हवेतून आपले भक्ष्य शोधत उडत होता. आभाळ भरून आल्यामुळे म्हणावा असा प्रकाश नव्हता.

हेही वाचा: अहमदनगर : सुवर्णव्यावसायिकास मागीतली दोन कोटींची खंडणी

दूर अंतरावर मोंट्याग्यूचा भोवत्या आपल्या पायात एक नाकतोडा पकडून मस्तमध्ये त्याचे लचके तोडत खात बसलेला. मोंट्याग्यूचा भोवत्या, गप्पीदास, तिरचिमणी देवससाणा आदी पक्षी पाहण्यास मिळत होते.

अचानक पांढुरका भोवत्या दोन- तीन ठिकाणी बसलेला दिसला. लाजाळू व सावध असलेला पांढुरक्‍या भोवत्या चाहूल लागताच उडून जात होता. काही अंतर पुढे आल्यानंतर रस्याच्या कडेला साठ- सत्तर फुटावर पांढुरका भोवत्या पक्षी मस्त बांधावर बसलेला दिसला. लांबच असताना गाडी बंद करून ढकलत जवळपास चाळीस एक फुटावर जाऊन पोहोचले. गवतातील हालचाली लक्षात न आल्याने त्याचे फोटो काढता आले. जवळपास अर्धा तास फोटो काढून घेतल्यावर परत गाडीकडे येताना त्याला चाहूल लागल्यावर या पांढऱ्या हिऱ्याने आकाशाकडे झेप घेतली.

loading image
go to top