esakal | भाजपमध्ये पंकजा मुंडे, एकनाथ खडसे व विनोद तावडे यांचे स्थान काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Who is the BJP candidate for the Legislative in Maharashtra Council

देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही त्याने सर्वत्र हातपाय पसरले आहेत. त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. त्यातूनच जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आता सुरु आहे. एकीककडे कोरोनाशी सामना सुरु असतानाच राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्‍नही गाजत आहे. दरम्याने निवडणूक आयोगाने संरक्षणाची काळजी घेत विधानपरिषदेच्या निवडणूकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपमध्ये पंकजा मुंडे, एकनाथ खडसे व विनोद तावडे यांचे स्थान काय?

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही त्याने सर्वत्र हातपाय पसरले आहेत. त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. त्यातूनच जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आता सुरु आहे. एकीककडे कोरोनाशी सामना सुरु असतानाच राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्‍नही गाजत आहे. दरम्याने निवडणूक आयोगाने संरक्षणाची काळजी घेत विधानपरिषदेच्या निवडणूकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाकरता येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावरही विरोधकांकडून प्रश्‍न चिन्ह निर्माण करत आहेत. तर दुसऱ्याबाजूला विरोधकांनाही ठाकरेंचे समर्थक उत्तर देताना दिसत आहेत. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एका युवतीने विचारलेल्या प्रश्‍नांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी २० प्रश्‍न केले आहेत. त्यात एकोणिसाव्या प्रश्‍नात म्हटले आहे की, ‘तुम्ही फक्त आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनाच सोबत घेऊन चालता, मग भाजपामध्ये नितीन गडकरी, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे व विनोद तावडे यांचे स्थान काय? त्यातच विधानपरिषदेच्या उमेदवारीमध्येही त्यांची नावे न आल्याने ही पोस्ट चर्चेची ठरत आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोशल मीडियाच्या फेसबुकवर अयोध्या पोळ यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘देवेंद्रजी, मी अयोध्या पौळ. तुमच्या भाजपच्या एकाही नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या पोस्टवर रिऍक्ट करणार नाही. महाराष्ट्र राज्यातील एकही व्यक्ती रिऍक्ट करणार नाही याची मी स्वतः हमी घेते. फक्त त्यांनी खालील गोष्टी सांगाव्यात. 1) 15 लाख कधी भेटतील? 2) 100 स्मार्ट सिटी कधी दाखवणार? 3) 33 कोटी झाडे कुठे लावली? 4) 5 लाख विहीरी कुठे बांधल्या? 5) फडणवीस साहेब यांनी चहा पाण्याचा खर्च तीन कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये सांगितला ते चहा पाणी कुणाला व किती वेळा पाजले 6) जाहिरातीचा खर्च 15 कोटी 51 लाख रुपयांचा, त्या जाहिराती वैयक्तिक होत्या की सरकारी? 7) धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला डांबून का ठेवले होते? 8) सर्व मीडिया समोर पद व जबाबदाऱ्या यांचे समसमान वाटप होईल हे बोलुन सुद्धा धडधडीत खोटे का बोलले? 9) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असुन सुद्धा CM फंड प्रमोट न करता PM फंड का प्रमोट केला? 10) संपूर्ण जगासोबत महाराष्ट्र सुद्धा कोरोना माहामारी ने परेशान असताना तुम्ही महाविकास आघाडी सरकारला माणुसकी विसरून घाणेरडे राजकारण का करता? 11) तुम्ही बोलले होतात की पाच वर्षात तुम्ही तुमच्या मुलीला वेळ दिला नाही व कुठे बाहेर घेऊन गेला नाहीत, तर मग सहकुटुंब क्रुझवर फोटोसेशन कोण करत होते? 12) महाराष्ट्र पोलिस यांचे बँक खाते एसबीआयमधुन ॲक्सेस बँकेत का वळवले? 13) नमस्ते ट्रम्पसाठी जो अवाजवी खर्च करून गरीबांच्या तोंडासमोर भिंत उभारली त्यापेक्षा त्यांना घरे बांधून देऊ शकले असते असे तुम्हाला वाटत नाही का? 14) कोरोना माहामारीचा पहिला रुग्ण जानेवारीत आढळून आला मग ट्रम्प यांचे विमानतळावर स्कॅनिंग का केले नाही? 15) भाजपा पक्ष श्रेष्ठींनी अंतर्गत गटबाजीमुळे निष्ठावंतांना डावलून नवख्यांना उमेदवारी दिली तुम्ही मध्यस्थी का केली नाही? 16) 2013 मध्या सुधीर मुनगंटीवार व तुम्ही यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली अन 2014 मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतली, याबद्दल काय सांगाल? 17)  कोरोना माहामारीत महाराष्ट्र राज्यासाठी तुमचे योगदान काहीच दिसले नाही आणि महाविकास आघाडी सरकारचे सहा महीने पुर्ण झाले की ते सरकार पडणार, असा खरा न होणारा तर्क वितर्क लावुन परत तुम्हीच मुख्यमंत्री होणार हा सत्ता पिपासू पणा करणे योग्य वाटते का? 18) तुम्ही नेहमीच “मी, मला, माझी” असा स्वार्थीपणा का ठेवता? 19) तुम्ही फक्त आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनाच सोबत घेऊन चालता, मग भाजपामध्ये नितीन गडकरी, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे व विनोद तावडे यांचे स्थान काय? 20) महाराष्ट्रात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे तरी तुम्ही शिवसेनेला लहान पक्ष की समजता? साहेब अजून बरेच प्रश्न आहेत कधी भेटुन उर्वरित प्रश्न नक्कीच विचारेल अन माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नसेल, असं त्यांनी म्हटलं आहे. अयोध्या पौळ या युवासेना- युवतीसेनेच्या विधानसभा समन्वय असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. यातील प्रश्‍नामुळे ही पोस्ट सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.