‘सिनेट’मध्ये कोण मारणार बाजी? सुटा, विद्यापीठ विकास मंच, 'वालचंद'कडून विजयाचा दावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सिनेट निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. २९ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
ahilyadevi-holkar_201903209065.jpg
ahilyadevi-holkar_201903209065.jpgsakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सिनेट निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. २९ सप्टेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीत विशेषत: पदवीधर मतदारसंघात विद्यापीठ विकास मंचला ‘सुटा’चे आणि शिक्षक मतदारसंघात वालचंद समुहाला ‘सुटा’शी मुकाबला करावा लागणार आहे. उमेदवार आता मतदारांच्या दारापर्यंत जावून प्रचार करीत आहेत.

वालचंद शिक्षण समुहातर्फे संस्थाचालक मतदारसंघातून वैभव गांधी, शिक्षक मतदारसंघातून (खुला प्रवर्ग) डॉ. वंदना गवळी आणि डॉ. सचिन देशमुख (विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्ग) तर अकॅडमिक कौन्सिलमधून सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी डॉ. सयाजी गायकवाड हे निवडणूक लढवीत आहेत. तसेच पदवीधर मतदारसंघातून जिवराज कस्तुरे आणि अजितकुमार संगवे, राजश्री शिंदे, प्रशांत पाटील हे निवडणूक लढवत आहेत. प्रचारप्रमुख म्हणून प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्याकडे नियोजन आहे. उमेदवारांनी मोहोळ, अनगर, बीएमआयटी, वडाळा, वैराग, बार्शी येथे भेटी देऊन मतदारांना वालचंद समुहाचे कार्य व भूमिका स्पष्ट केली. पण, निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळातील मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, उमेदवारांना प्रचारासाठी आणखी सात दिवसांचा कालावधी आहे.

विद्यापीठ विकास मंचाला रेड्डींचा पाठिंबा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) निवडणुकीतील खुल्या प्रवर्गातील उमेदवार राजेश दिड्डी यांनी बुधवारी (ता. २१) विद्यापीठ विकास मंचला बिनशर्त पाठिंबा दिला. विद्यापीठ विकास मंचचे निवडणूक प्रमुख प्रा. देवानंद चिलवंत यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. यावेळी विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक ॲड. अमोल कळके, उमेदवार संदीप पिसके उपस्थित होते. विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार देखील मतदारांच्या भेटी घेत असून आम्हाला विजयी करा, असे आवाहन करीत आहेत.

विजय आमचाच ‘सुटा’ला विश्वास

संभाजी ब्रिगेड व युवासेनेला सोबत घेऊन ‘सुटा’ संघटना पदवीधरची तर उर्वरित मतदारसंघाची निवडणूक प्राचार्य व संस्थाचालक संघटनेच्या पाठिंब्याने लढवित आहे. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनीही ‘सुटा’ला साथ दिली आहे. निवडणुकीचा प्रचार आता सुरु झाला असून बुधवारी (ता. २१) सुटाचे पदाधिकारी व सिनेट निवडणुकीतील उमेदवारांनी वडाळा, बार्शी, कुर्डूवाडी आणि वैराग येथे दौरे केले. आता उद्या (गुरुवारी) सोलापूर शहरातील सर्वच महाविद्यालयांना भेटी देऊन ‘मतदान आम्हालाच करा’, असे आवाहन ते करतील. कोणत्याही राजकीय नेत्यांच्या मदतीशिवाय आम्ही निवडणूक लढवत असून सिनेट निवडणुकीत आम्हीच बाजी मारू, असा विश्वास ‘सुटा’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com