esakal | लिंकच्या नावाखाली शेतकऱ्यांना नको असलेला माल देता कशासाठी? कोणी मांडला प्रश्‍न वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

khate.jpg

सध्या बहुतांश खरीप हंगामातील पीके पाणी लागल्यामुळे वाया गेले आहेत. तर जे पीक हातात आले आहे त्याला जवळ बाजारपेठ कोरोनाच्या संकटात उपलब्ध नाही. त्यामुळे हाती आलेल्या शेतीतील पिकाचे उत्पन्न मिळू शकत नाही. ज्वारीचे कोठार असलेल्या तालुक्‍यात गतवर्षीचा कडबा पाण्याने कुजून गेला. एकच पिक रब्बी हंगामात घेणाय्राचा विचार करता आतापासूनच तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. 

लिंकच्या नावाखाली शेतकऱ्यांना नको असलेला माल देता कशासाठी? कोणी मांडला प्रश्‍न वाचा 

sakal_logo
By
हुकूम मुलानी

मंगळवेढा (सोलापूर)ः कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना युरियाच्या तुटवड्यामुळे मागणीप्रमाणे खते मिळत नाहीत. विक्रेत्यांकडून लिंकींगच्या नावाखाली शेतकऱ्यांना अनावश्‍यक खते माथी मारली जात आहे. हंगामात मागणीप्रमाणे खते उपलब्ध करावीत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

हेही वाचाः महापालिका हद्दीत 95 कोरोना बाधित, एकाचा मृत्यू, 29 जण कोरोना मुक्त 

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या बहुतांश खरीप हंगामातील पीके पाणी लागल्यामुळे वाया गेले आहेत. तर जे पीक हातात आले आहे त्याला जवळ बाजारपेठ कोरोनाच्या संकटात उपलब्ध नाही. त्यामुळे हाती आलेल्या शेतीतील पिकाचे उत्पन्न मिळू शकत नाही. ज्वारीचे कोठार असलेल्या तालुक्‍यात गतवर्षीचा कडबा पाण्याने कुजून गेला. एकच पिक रब्बी हंगामात घेणाय्राचा विचार करता आतापासूनच तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. 

हेही वाचाः सोलापूर ग्रामीणमध्ये 281 नविन कोरोनाबाधित रुग्ण 

सध्या विक्रेत्याकडून लिंकच्या नावाखाली अनावश्‍यक खते व रसायने शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सदरची अनावश्‍यक खाते शेतकऱ्याच्या घरी तशीच पडून आहेत. त्यामुळे अनावश्‍यक खते माथी मारण्यापेक्षा मागणीप्रमाणे खत उपलब्ध करावे अशी मागणी निवेदनात नमूद केली. या निवेदनावर शहराध्यक्ष हर्षद डोरले, ऍड. राहुल घुले, सचिन गोसडे, श्रीकांत पाटील, उल्हास माने आदीच्या सह्या आहेत.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

loading image
go to top