
सोलापूर : अनगर (ता. मोहोळ) अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून पेनूर, पाटकूल व तांबोळे ही ३ गावे वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वास्तविक संपूर्ण अनगर अपर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी असताना, दळणवळण सुविधा नसल्याचे कारण देऊन केवळ तीन गावे वगळण्याचा निर्णय म्हणजे शासनाची व मोहोळ तालुक्यातील जनतेची दिशाभूल करणारा आहे.