भांडणात धुळप्पा याने प्रगतीला मारहाण केली. त्यात तीही जखमी झाली. भांडण विकोपाला गेल्याने तिने दंडुक्याने डोक्यावर मारल्याने तो रक्तबंबाळ झाल्याने बेशुद्ध पडला.
सोलापूर : भांडणातून रागात पत्नीने दंडुक्याने डोक्यावर मारुन पतीचा खून (Husband Murder) केला. त्यानंतर स्वतः पोलिसांना कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. शुक्रवारी (ता. ५) दुपारी चारच्या सुमारास तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपी पत्नीविरुद्ध सोलापूर तालुका पोलिसांत (Solapur Taluka Police) गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.