पत्नीचा खून करून पती फरार! दोन चिमुकली मुले झाली पोरकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali Gharbudave
पत्नीचा खून करून पती फरार! दोन चिमुकली मुले झाली पोरकी

पत्नीचा खून करून पती फरार! दोन चिमुकली मुले झाली पोरकी

- बलभीम लोखंडे

वैराग (सोलापूर) - बार्शी तालुक्यातील मुंगशी (आर) ते उपळे दुमाला दरम्यान रस्त्यावर अज्ञात कारणाने पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिला ठार मारल्याची घटना मंगळवार ता. 23 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत पतीच्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित आरोपी पती किरण तुकाराम घरबुडवे (रा. भातंबरे ता. बार्शी) हा आपल्या पत्नी मयत सोनाली किरण घरबुडवे, मुलगी दिक्षा (वय 6) व मुलगा सिद्धार्थ (वय 3) यांचेसह ता. 29 रोजी धामणगाव येथे आले होते. दोन-तीन दिवस ते धामणगाव येथे थांबले. मंगळवारी 23 रोजी सकाळी नऊच्या सुमारास धामणगाव येथून ते भातंबरे कडे जाण्यासाठी निघाले .दरम्यान मौजे मुंगशी (आर) ते उपळे दुमाला दरम्यानच्या रस्त्यात पती किरण घरबुडवे याने आपली पत्नी सोनाली हिच्या बरोबर भांडण केले व तिच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. मयत सोनालीचा भाऊ अतुल दिलीप हेडंबे रा. धामणगाव यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत.

loading image
go to top