
-महेश पाटील
सलगर बुद्रुक : येथील वनविभागातील वन्यप्राण्यांकडून वन विभागालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना दिसत आहे.याबाबत वनविभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे वन विभाग परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणने आहे.त्यामुळे सलगर बुद्रुक येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार व कर्मशून्य नियोजनाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे वनविभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.