सलगर बुद्रुक : मंगळवेढ्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या सलगर बुद्रुक गावातील वनविभागातील वन्यजीवांचे पाण्यावाचून हाल होत असल्याचे वृत्त सकाळ मध्ये प्रसिद्ध होताच,वन विभागाला जाग आली..अन लगेच दुसऱ्या दिवशी शोभेच्या वस्तू बनलेल्या पाणवठ्यात वनविभागातील कर्मचाऱ्यांनी टँकरच्या सहायाने पाणी भरले.अन वन्यजीवांची तहान भागवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली.असंवेदनशील वन विभागाच्या गैरकारभाराची सकाळ मध्ये वाचा फोडल्याचा परिणाम म्हणूनच आज तात्काळ पाचही पाणवठयांमध्ये पाणी भरण्याचे काम झाल्याने गावातील नागरिकांनी सकाळच्या पाठपुराव्याचे आभार मानले..याबाबत सविस्तर वृत्त सकाळच्या 22 तारखेच्या अंकात प्रसिद्ध झाले होते.250 एकरावर पसरलेल्या विस्तीर्ण अश्या वनविभागातील चार पानवठ्यानमध्ये पाणी नसल्याने वन्यजीवांचे हाल होत असल्याचे वृत्त सकाळ ने प्रसिद्ध केले होते.त्यानंतर तालुका विभागाचे वनपाल महेश मेरगेवाड यांनी या बातमीची तात्काळ दखल घेऊन वनरक्षक कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला व स्वतः सलगरच्या वनविभागाला भेट देऊन वनविभागातील चार कोरड्या असलेल्या पाणवठ्यात पाणी भरण्याचे काम केले..अस्तरीकरण गरजेचे -दरम्याम पाणवठ्यातील अस्तरीकरण केलेले प्ल्यास्टिकचा कागद पाणवठ्यात नसल्याने पाणवठ्यात भरलेले पाणी झिरपून जाणार आहे.त्यामुळे अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.शिवाय संपूर्ण उन्हाळ्यात पाणवठे भरलेल्या अवस्थेत राहणे गरजेचे आहे अशी भावना वन्यजीव प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे..Child Marriage : अल्पवयीन मुलीचे लावले लग्न.महेश मेरगेवाड,वनपाल मंगळवेढा वनविभाग-सलगरच्या वनविभागाला भेट दिली.कोरड्या असलेल्या चारही पाणवठ्यात टँकरने पाणी भरून घेतले.संपूर्ण उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल.कामचुकार कर्मचाऱ्यांना यापुढे चूक करण्याची संधी दिली जाणार नाही.मी नेहमीच सकाळचा वाचक राहिलो आहे.सकाळ ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याने आम्हला या समस्येची जाणीव करून दिली याबद्दल सकाळचे आभार..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.