esakal | समाजासाठीचे योगदान पाहून उमेदवारी देणार ; डाॅ धवलसिंह मोहिते-पाटील | Solpaur
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

समाजासाठीचे योगदान पाहून उमेदवारी देणार ; डाॅ धवलसिंह मोहिते-पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : सकाळ वृत्तसेवा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी समाजातील लोकांसाठी काय योगदान दिले हे पाहून उमेदवारीची निश्चिती केली जाईल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष डाॅ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर तालुकानिहाय काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करीत आहेत ते मंगळवेढा दौऱ्यावर आले असता बोलत होते ते म्हणाले की जिल्ह्याचे राजकारण करताना स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांकडे कार्यकर्ता घडवणारा कारखाना म्हणून संबोधले जायचे.

त्यामुळे प्रत्येक पक्षात स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना मानणारा कार्यकर्ता आहे त्यांचे पक्षीय विचार वेगवेगळे असले तरी मी काँग्रेस पक्षाची विचारधारा घेऊन जात आहेत या विचाराशी सहमत असणाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत असल्याचे ते म्हणत ग्रामीण भागात सध्या काँग्रेस पक्षाने कात टाकली असून सध्याच्या काळात कार्यकर्ता टिकून राहणे महत्त्वाचे आहे सत्ता असताना कार्यकर्त्याचा काहीही फायदा होत नाही कार्यकर्ता हा पक्षाच्या विचारधारेवर टिकून राहतो.तशी काॅग्रेसची विचारधारा फार मोठी असल्याने तरुण कार्यकर्त्यांना बळ देताना बूथवाईज कमिटी तयार करणे.

पक्ष बळकटीकरिता कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करणे हे काँग्रेसचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगत लखीमपूर येथे न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडले तर काही मृत्यूशी झुंज देत आहेत या प्रकाराने देशात भाजप विरुद्ध संतापाची लाट तयार झाली.या अन्यायाला सर्वस्वी केंद्रातील सरकार जबाबदार आहे.

त्यांना येणाऱ्या काळात त्याची किंमत भोगावी लागणार आहे. जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरणाचे पाणी बारमाही वरून आठमाही झाले. जिल्ह्याच्या हक्काचे पाणी कोणी नेत असेल तर प्रसंगी आंदोलन करण्याची देखील आपली तयारी असल्याचे ते यावेळी म्हणाले यावेळी तालुकाध्यक्ष अॅड नंदकुमार पवार,संदीप फडतरे, दिलीप जाधव,अर्जुनराव पाटील, राजाभाऊ चेळेकर,मारुती वाकडे, राजाराम सूर्यवंशी नाथा ऐवळे, मच्छिंद्र भोसले, पांडुरंग जावळे भिमराव मोरे, मनोज माळी उपस्थित होते.

loading image
go to top