esakal | दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जूनमध्ये या आठवड्यात लागणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Will the results of 10th and 12th exams be released this week in June

राज्यात दीड महिन्यापासून कोरोना व्हायरला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे नववीपर्यंच्या व आकरावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत. दहावीचाही एक पेपर झाली नाही. अशा स्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घेण्यात आलेल्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र जुनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जूनमध्ये या आठवड्यात लागणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात दीड महिन्यापासून कोरोना व्हायरला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे नववीपर्यंच्या व आकरावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत. दहावीचाही एक पेपर झाली नाही. अशा स्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घेण्यात आलेल्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र जुनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांचं पेपर तपासण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते. बोर्डाकडून पेपर तपासण्याचं काम सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मूल्यांकन पूर्ण होऊन दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारण 10 जूनपर्यंत निकाल येईल असा कयास व्यक्त केला जात आहे. हा निकाल दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी mahresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील का अशी चर्चाही व्यक्त केली जात आहे.
अत्यावश्यक सेवांसोबतच बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा, पोलिस, डॉक्टर, पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकही आपलं कर्तव्य निभावत आहेत. 
सध्या कोरोना व्हायरसमुळे शाळा, महाविद्यालयं बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युजीसीनं शिफारस केल्याप्रमाणं यंदाचं शैक्षणिक वर्ष सप्टेंबर ते जुलै असं करण्याचा विचार सुरू आहे.