

केत्तूर, सोलापूर : यंदा समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतशिवारातील ताली पाण्याने भरून वाहिल्या आहेत. साठलेल्या पाण्यामुळे तयार झालेल्या दलदलीमुळे पक्ष्यांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात हिवाळा ऋतू पक्ष्यांना हिताचा ठरत आहे.