crime
sakal
टेंभुर्णी - सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णीतील बाह्यवळण रस्त्यानजिक एका 26 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी सात ते बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. या महिलेस जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार व मारहाण केल्याप्रकरणी एका तृतीयपंथीसह पाच जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाचही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी शारदा झुरंगे, प्रविण चव्हाण, राखी मल्होत्रा तृतीयपंथी, लखन तांदळे,बाळू जाधव (रा. सर्व टेंभुर्णी, ता. माढा) या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.