

सांगोला : दुचाकीला टमटमने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या आईचाही मृत्यू झाला आहे. केराबाई लक्ष्मण दुधाळ (रा. कटफळ, ता. सांगोला) अशा मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.