
करमाळा : बिटरगाव (श्री.) (ता. करमाळा) येथे शेतात बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दावे तुटल्याने लाकूड डोक्याला लागल्याने ३४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे. मनीषा नितीन मुरूमकर असे या महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पती, सासू व सासरे असा परिवार आहे.