
सोलापूर : सोलापूर -हैदराबाद रोडवरील रुपाभवानी मंदिराजवळील सोलापूर टेक्स्टाईलसमोर भीषण अपघात झाला. डी-मार्टसमोरील रोडने शेळगीकडे जाणाऱ्या दुचाकीला हैदराबाद रोडहून पुण्याकडे जाणाऱ्या जीपने जोरात धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही महिला रस्त्यावर पडल्या. रोहिणी सुरेश पुप्पल (वय ४५, रा. शेळगी) या गंभीर जखमी झाल्या असून अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर उषा नारायण वाघे (वय ३८, रा. लोहारा, जि. धाराशिव) या जखमी झाल्याची माहिती जोडभावी पेठ पोलिसांनी दिली.